Maha Hit 24
Register

जाहिरात

 

एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण

schedule16 Sep 24 person by visibility 99 categoryशैक्षणिक

सहज एकदा वर्तमानपत्र वाचत असताना कुठून तरी गाण्याचे सूर कानावर ऐकू आले ते असे "ये दुनिया एक दुल्हन दुल्हन ये माथे की बिंदीया आय लव्ह माय इंडिया"

आणि मनात विचार आले आज आपला देश खरंच का कुणाच्या तरी माथ्यावरील बिंदीया बनण्याच्या लायकीचा आहे ? खरं तर आजही आपल्या देशात कुणा नववधूच्या माध्यावरील बिंदी तिच्या एकनिष्ठतेचे, तिच्या मांगल्याचे प्रतिक मानले जाते. अशी एकनिष्ठता, महानता,सर्वधर्मसमभाव, एकता, माणुसकी,त्याग आणि विश्वास आज आपल्यात आहे का ?

लाखो लोकांच्या प्राणार्पणातून जन्माला आलेल्या या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत का ? की या स्वातंत्र्याचा कुठे अतिरेक तर नाही ना होत ? या स्वातंत्र्याची जागा स्वैराचाराने घेतली नाही ना? असे वादळ मनात उठणे साहजिकच आहे, कारण आपल्या पूर्वजांनी नुसती प्राणाची आहुती देऊन आम्हांला स्वातंत्र्यच मिळवून दिले नाही तर आपल्या सत्कृत्यातून कित्येक आदर्श तत्वज्ञान जीवनमूल्ये आमच्यापुढे ठेवून गेले आहेत, पण ही जीवनमूल्ये ठायीठायी पायदळी तुडवताना दिसतात. ज्या गांधीजींनी आम्हांला सत्य, अहिंसा शिकविली, त्यांची शेवटी हत्या करण्यात आली. ज्या आबेडकरांनी आम्हांला स्वाभिमान दिला तो आज आम्ही ठायीठायी लाचारीने गहाण टाकला आहे. केवळ पैशासाठी आज भारत देश भ्रष्टाचार, वासनाकांड अन् दहशतवाद यांच्या गुलामगिरीत अडकलाय

"स्वार्थी नेत्याचा भ्रष्टाचार। देशात माजलाय स्वैराचार ॥

गांधी नेहरूंची पवित्र भूमी। वारस त्यांचे आम्ही दुर्गुणी ॥"

आज भारत राजकीय, सामाजिक आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्राचा जावई बनला आहे. आमची बुद्धिमत्ता पैशाच्या तराजूत तोलली जाते. शिक्षणाच्या बाजारात "उषःकाल होता होता काळ रात झाली" असे म्हणण्याची वेळ आली आहे बेकारी, गुंडगिरी, त्यातून उभी राहणारी सामाजिक अशांतता यामुळे आपली भूमी पोखरत चालली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा उरलीय फक्त नावाला भारताभोवती आज या समस्या असल्या तरी गेल्या काही वर्षांत भारताने प्रचंड प्रगती साधली आहे. वसाहतवादाचा

वारसा लाभलेला भारत पूर्वी मागासलेपणाचे मूर्तिमंत प्रतिक होता. दोन तृतीयांश भारतीय दारिद्रयरेषेखाली होते. साक्षरता १/४ होती. भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता पण कणखर नेतृत्वामुळे भारत हा एकसंध व धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास आला. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारत ताठ मानेने उभा राहिला. भारताने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व संरक्षण क्षेत्रात आपले श्रेष्ठत्य सिद्ध केले आहे.

जरी अनेक भीषण प्रश्न भारतासमोर असले तरी भारतीय माणूस शून्यातून स्वर्ग निर्माण करणारा आहे. गेल्या शतकातील अपयश या शतकात नक्कीच धुऊन काढता येईल. श्रीमंत देशातील गरीब लोक व अविकसित जनता अशी भारताची प्रतिमा बदलून एक बलाढ्य

महासत्ता म्हणून या भारत भूमीचा गौरव होईल आणि गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल. साधनांची कमतरता असताना देखील भारताने प्रगती साधली आहे ती केवळ दुर्दम्य आशावादाच्या जोरावर आणि आमच्यापुढे असणाऱ्या म. गांधी, पं. नेहरू, डॉ कलाम यांच्या आदर्शानी आम्हांला शिकवले.

"येणाऱ्या दिवसांसाठी तयारीत राहा। त्यांना सास्खेच सामोरे जा ।। जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस। अन् हातोडा होशील तेव्हा घाव घाल ॥"

आम्ही ऐरणीचे घाव सोसून अपयशाकडून यशाकडे वाटचाल करत आहोत. एक अब्ज लोकसंख्या ही भारताची शक्ती आहे, अशक्य ते आम्हां काय आता.

"जिन्दगी एक सफर हे सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना " 

 ही जगाची बेफिकीर वृत्ती वाढत आहे. आज जगात भोगवाद, चंगळवाद यात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे खा, प्या, मजा करा ही लोकांची वृत्ती बनत चालली आहे. आज जो लोक केवळ भौतिक सुखाच्या मागे धावत आहेत त्यांना सत्य, प्रेम, सहानुभूती, प्रामाणिकपणा यांचा विसर पडत चालला आहे. आज शाळेत, महाविद्यालयात शिकणारी मुले हे सर्व संस्कार विसरली तर भविष्यात त्यांच्या वाट्याला दारुण उदासीनता येईल. यासाठी मूल्यशिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी यंत्रणा आवश्यक आहे आणि ती आजच्या काळाची गरज आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशाला आदर्श सांस्कृतिक वारसा असतानासुद्धा या वारसाचे विस्मरण आपल्याला झाले, आपणही भौतिक उन्नतीसाठी मृगजळापाठीमागे धावणारे मृग ठरलो. याचा अर्थ असा नव्हे की विज्ञानयुगाला, उद्योगीकरणाला सामोऱ्या जाणाऱ्या भारताचे पाऊल चुकीचे होते, पण हे करत असताना भारतियांच्या मनाचे स्वास्थ्य, सद्‌गुणांचा विकास ज्या प्रमाणात व्हावयास हवा होता, तो होण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन भारतीय शासनव्यवस्थेने, शिक्षणप्रणालीने दाखविले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आजच्या समाजातील मूल्यशिक्षण काय आहे या संदर्भात जगद्विख्यात तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे विचार अतिशय

मोलाचे आहे ते म्हणतात.

"Education is not merely acquiring knowledge, gathering & correcting facts, it is to see the

significance of life as a whole But whole cannot be approached through part which is what

government organised religious & authorization parties are attempting to do.

आकाशवाणी, साहित्य, वृत्तपत्रे, सिनेमा, दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे मूल्यशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे करू शकतील आज या साधनांचा समाजावर, समाजातील व्यक्तींच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातही ही साधने हातभार लावत आहेत.

मानवी मनावर संस्कार करण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये नक्कीच आहे. मुलांच्या ज्ञानात भर टाकून त्यांना बहुश्रुत करणे, त्यांच्या विचारशक्तीचा व बुद्धीचा विकास करणे हे कार्य साहित्य उत्तमरीतीने करू शकते. उदा. रामायण, महाभारत, भगवदगीता इ. वर्तमानमत्र ही जनतेची दैनंदिन गरज होऊन बसली आहे आणि त्यांची वाढती आवश्यकता हे सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे. पण काही उत्तम, दर्जेदार वर्तमानपत्रे सोडली तर त्यांचा ओढा लोकमत जागृत करण्यापेक्षा ते भडकवण्याकडेच अधिक असतो, त्याच्या अतिरंजितपणावरच अधिक भर दिला जातो, दोन्ही बाजूंचा विचार करून सत्य प्रदर्शित करण्याऐवजी

एकांगी स्वरूपात विचार करून एकतर त्याची अतिरिक्त स्तुती किंवा निंदा केली जाते. पक्षीय वृत्तपत्रे तर याहून एक पाऊल पुढे आपापल्या मतांच्या प्रचारापेक्षा विरुद्ध पक्षाच्या पुढाऱ्यांच्या कुरघोडी करण्यातच त्यांना मौज वाटते. अशीही वर्तमानपत्रे मुलेही वाचतात, त्यामुळे त्यांच्या अपरिपक्व मनावर अनिष्ट परिणाम होतो. वृत्तपत्रांनी आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी ओळखून वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीबाबत थोडा संयम आणि विवेक ठेवला तर दुष्परिणाम टाळला जाऊ शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सगळ्यात जास्त आकर्षण असते ते सिनेमाचे. नट-नट्यांच्या स्टाईलचा परिणाम घरोघरी समाजात सर्वत्र पाहायला मिळतो कॉलेजच्या नावावर घरातून निघून कॉलेजात न जाता सिनेमा पाहायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सारखी वाढत आहे. अर्थात यात विद्यार्थ्यांचा दोष आहे असे नाही जागोजागी, कानावर पडणारे अखंड सिनेसंगीत, त्याचप्रमाणे बहुसंख्य चित्रपटांमधून खून मारामाऱ्या, बीभत्स प्रसंग, उत्तान नृत्य, शृंगारिक प्रसंग यांचा भरणा दिसतो. अशाप्रकारचे परिणाम टाळता येऊ शकतात. सिनेमांचे सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांचा शिक्षणासाठी वापर करून घेणे फार आवश्यक आहे.

दूरदर्शन हे देखील तितकेच प्रभावीप्रसार माध्यम आहे. आकाशवाणीवर फक्त आवाज ऐकता येतो, तर चित्रवाणीवर आवाजाबरोबर दृश्यही पाहता येते, कोणत्याही प्रसंगाचे प्रत्यक्ष दृश्य पाहिल्याने त्यातून जो अनुभव मिळतो जे ज्ञान मिळते जो आस्वाद घेता येतो तो अधिक परिणामकारक असतो. त्यामुळे दूरदर्शन हे अनुभवी व ज्ञानससंक्रमणाचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक उपयुक्त कार्यक्रम वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात तेसुद्धा विद्याध्यांनी पाहणे आवश्यक आहे.
सिनेमा इतके नसले तरी त्यांच्या खालोखाल आकाशवाणी हे देखील एक दैनदिन करमणुकीचे साधन बनले आहे त्याच बरोबर त्यामुळे आपल्या ज्ञानातही भर पडत असते. परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे रेडिओ चालू असतो फक्त विविध भारती, आपकी पसंद, फिल्मी गाणी यांसाठीच गाणी ऐकणे, किंवा म्हणणे हे काही अनैतिक कृत्य नाही पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, आकाशवाणीवर अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. बातम्या महिला शेतकनी कामगार, व्याख्याने, परंतु ते शाळेच्या, कॉलेजच्या वेळातच होतील असे नाही, तरी त्यासंबंधीही सूचना व पूर्वज्ञान देऊन ते कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकण्यास सांगावेत व दुसऱ्या दिवशी त्याच्याशी कार्यक्रमातील मुद्यांवर चर्चा करावी.
मूल्याचे शिक्षण देण्याचे कार्य प्रसारमाध्यमे अधिक प्रभावीपणे करू शकतील पैशांचा छनछनाट प्रसिद्ध आणि मला काय व्याचे ? ही बेपर्वाईची वृत्ती सोडल्यास खरोखरच प्रसारमाध्यमातून मूल्यशिक्षण देणे हे अवघड नाही तर सहज शक्य आहे.
मीच एक आव्हान कर्तृत्वाची मशाल घेऊन गाईंन मी गुणगान राष्ट्रीय विकास साधू आम्ही हेच आमुच्या कर्तृत्वाचे गाणे महान'
आजची युवा पिढी एक देशाचा आधारस्तंभ परिस्थितीचे लगाम खेचून तिला काबूत आणणारी ही पिठी आजच्या युवकांनी साहसाच्या लक्ष्मणरेषा केव्हाच आखलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या शक्तीचा विध्वंस होणे शक्यच नाही, कार्याची पताका अखंड फडकावीत ठेवणे हेच युवकांचे ध्येय आणि ते ध्येय गाठण्याचा युवक तंतोतंत प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो म्हणून तर आज युवा संघटना युवा मंडळे स्थापन होत आहेत. त्यांच्या कार्याची दीपज्योती अखंडपणे लेवत आहे, शिवाय ती तेवत राहीलही मग युवकांवर टीकेचे कुत्सित बोलण्याचा भडिमार कशासाठी? अहो, त्यांना तर तुम्ही प्रेरणा द्यायला हवी. युवक तर देशाचे भक्त आहेत.
"विशाल आमुची मायभूमी ही आम्ही तिची लेकरे मनात आमुच्या नित्य वाहते तारुण्याचे वारे."
दिसते, आज आपल्या देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती समाधानकारक दिसत नाही. तरीही आपल्याला जेवढे चांगले प्रयत्न केला पाहिजे. त्याला बुद्धीची जोड दिली पाहिजे. तरच ते स्वीकारण्याचा तरुणांनी युवकांपुढे चांगले आदर्श प्रत्त्थापित होतील. हे सर्व करताना देशाने माझ्यासाठी काय केले, असे म्हणण्यापेक्षा मी देशासाठी काय करेन याचा विचार झाला पाहिजे, त्याचबरोबर सध्या देशातील तरुणांना शिक्षण घेतल्याने कष्ट नको वाटतात. कष्टांची कामे करावीशी वाटत नाहीत. वास्तविक पाहता शिक्षण आणि कष्ट याचा काही एक संबंध नाही. म्हणून तरुणांनी प्रथम मन आणि बुद्धीबरोबर मनगट सक्षम केले पाहिजे.
जन्मदात्री आई आणि जन्मभूमी ही मानवी जीवनातील सर्वोत्तम स्थाने आहेत. तरुणांना खरोखरच राष्ट्राचा विकास व्हाचा असे वाटत असेल, तर त्यांनी समाजकारण स्वीकारावे गलिच्छ राजकारणात स्वतःला झोकून देऊ नये. तरुणांनी देशविकासासाठी झटले पाहिजे, सध्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागला नवनवीन उद्योगधंदे आधुनिक शेतीसाठी पावले उचलावीत. इतर राष्ट्रातील लोक भारतात येऊन धंद्यात प्रगती करत आहेत. आपणही आपले शिक्षण फक्त नोकरीसाठी आहे हे विसरून ते कल्पक बुद्धीने शेती आणि धंद्यासाठी वापरावे आणि आपले कर्तृत्व उभे करावे. आपण जे शिक्षण घेतो ते सत्त्वयुक्त असावे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे नाही तर मराठी बी.ए झालेल्या व्यक्तीला मुलाखतीवेळी निसर्ग अध्येता आठवत नाही. असले शिक्षक काय कामाचे ? जे चांगले शिक्षण घेलाल, विज्ञान क्षेत्रात भरारी मारतात असे युवक भरतात आमच्या बुद्धीला, कर्तृत्वाला वाव मिळत नाही म्हणून परदेशात जातात. ज्या मातीत आपण वाढलो, फुललो तिला विवरता कामा नये, अशा तरुणांनी येथेच थांबून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे, आजचा तरुण नोकरी कामधंदा मिळत नाही असे म्हटल्यावर राजकारण्यांमागे धावाधाव करतात. राजकारणी चतुर असतात. त्यांना माहीत असते या तरुणाच्या पोटात आग आहे, व्याकूळ भूक आहे. भाकरीचा शोध आहे. ते या युवा शक्तीचा उपयोग दंगली घडविण्यासाठी, गुन्हेगारीसाठी करतात. म्हणजे त्याच्या देशविघातक कृत्यांना आपण वाहून घ्यायचे का हा युवकांपुढे प्रश्न आहे, त्यांनी असला प्रपंच सोडावा आणि आपल्या कल्पकबुद्धीने, आपल्या अमोघ कर्तृत्वाने कोणत्याही क्षेत्रात झळकण्याचा प्रयत्न करावा रामदासांनी म्हटलेल्या कष्टाविना फळ नाही या वचनाप्रमाणे तरुणांनी वागले पाहिजे. गुलाबाचे फूल घेताना काट्यांशी सामना करावा लागणारच, हे त्यांनी ध्यानात घ्यावे आणि आपला वेळ अशा रिकामटेकडेपणात घालवू नये. त्यांनी अर्जुन बनून असल्या अधर्मी शक्तींचा निःपात केला पाहिजे.
आजचा युवक संस्कृती आणि राष्ट्राचा भक्त आहे. त्याला देशाच्या लोकशाहीची धुरा अखंडपणे पेलायची आहे. सध्या तिला कीड लागली आहे. अशा वेळी लोकशाही भक्कम करण्यासाठी त्याला वैचारिक, सामाजिक क्रांती करायची आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दातच सांगायचे तर त्याचबरोबर युवकांनी देशविकासासाठी आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी देशातील कायदे भारतीय राजकारण अशा बाबी सामान्य जनतेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पोचवून लोकशाहीचा चौथा खांब मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशातील जनता साक्षर असेल तर देश सजीव अन्यथा निर्जीव असे म्हटले जाते. ते खरे ही आहे म्हणून तरुगानी आपल्या परिचयातील दोन-तीन तरी निरक्षरांना साक्षर करण्याचा विडा उचलला पाहिजे.
माणूस जन्माला येतो तेव्हा एकच जात अस्तित्वात असते, ती म्हणजे मानवजात. आपल्या देशात अनेक जाती- धर्म आहेत. यास्तव लग्न करताना प्रामुख्याने आपल्या जातीतीलच जोडीदाराचा विचार होतो. याचा अर्थ, एका अधनि आपण मानव जातच विसरतो. हा तसा बौद्धिक याचा अर्थ, एका अर्थाने आपण मानवजातच विसरतो. हा तसा बौद्धिक अप्रामाणिकपणा वाटतो. म्हणून तरुणांनी आंतरजातीय विवाहास चालना दिली पाहिजे, यातून एक आदर्श मानवजात निर्माण होईल असे वाटते, आजचे साक्षर युवक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतला फरक त्यांना दिसत नाही. तरच देशाची युवा पिढी मजबूत होऊन देश सशक्त बनेल.
आजचा तरुणांनी मौजमजेबरोबर समोर एक ध्येय ठेवावे आणि त्यासाठी जिवाचे रान करावे आणि स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी सिद्ध व्हाये. आजचा तरुण पिढीपुढे राष्ट्रीय विकासाची अनेक आव्हाने आहेत, त्यांनी आव्हानांना भिता कामा नये. त्याच्याशी दोस्तीचा हात पुढे केला पाहिजे आणि म्हटले पाहिजे.
" बचे मनके सचे, सबकी आँखके है ये तारे " 
मनाने निर्मळ असणारी ही बालके, खरेच भारतमातेच्या भविष्यातील उज्ज्वल असे तारे आहेत सृष्टीचा नियमध आहे, जुनी पाने पडून-गळून जातात, त्या जागी नवीन पालवी फुटते, ती झाडाला फुलवते. बहरते, सर्वांना फळे-फुले देते, अगदी तशीच कथा या आपल्या छोटया-छोट्या बालकांची आहे. मानवी जात, समाजाचे अस्तित्व, गाव, देश आणि सारे जग हे याच जीवनचक्रातून फिरत असते. परंतु आजच्या बदलत्या काळानुसार आई-वडील दोघेही नोकरीसाठी बाहेर पडतात. घरात आता आजी-आजोबाही मिळणे अशक्य असते. वाढत्या महागाईने अर्थार्जनासाठी. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील नोकरी करतात बालकांना मात्र उजाडल्यापासून पाळणाघरात भरती व्हावे लागते. वाढती लोकसंख्या आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे 'हम दो हमारा एक' या संकल्पनेकडे आता कुटुंबे झुकत चालली आहेत. पाळणाघरातही चांगल्याप्रकारे बालकाचे सामाजीकरण होईलच असे नाही. जसजसा बाळ मोठा होतो. तसतसे त्याचे सोबती दोस्त वाढतात. 'शाळा-शिक्षण-अभ्यास-विविध प्रकारचे क्लास' यामुळे ती मुलेही पूर्णपणे व्यस्त राहतात. आपल्या भावना, आपले विचार कोणापुढे व्यक्त करण्याची ना सोय असते, ना सवड, भीतीमुळे त्यांचे विचार दबले जातात. आई-बाबांशी बोलण्यासाठीही फोनचा आधार घ्यावा लागतो. अर्थातच हे आवड वय आणि लहान कोवळ्या वयात समोर असणारी असंख्य प्रलोभने टीव्ही, जाहिराती, संगीत, गाणी, खेळ, व्हिडिओ आणि आतातर इंटरनेटवरील चिटचॅटींग, नकळत ही मुले वाहवत जातात. आईच्या अंगाई गीताच्या जागी,डॉल्बी गाणी-कर्कश आवाज त्यांना ऐकावे लागतात. समोर जेवण-खाण तर ते काढून ठेवलेले किंवा कधी कधी बेकरीतील पदार्थ यावर भागवावे लागते. ना प्रेमांचा हात, ना नात्यागोत्यांची ओळख, ना कुटुंब, ना घर, ना दार, ना गाव आणि ना देश. कशाचाच परिचय त्यांना झालेला नसतो. कशाबद्दलचे प्रेम त्यांच्यात निर्माण झालेले नसते.
तसे पाहता काळ हा नित्य परिवर्तनशील आहे. तसेच या मुलांना योग्य दिशा दाखविण्यासाठी ही आजकाल विविध संस्था कार्यरत आहेत. शाळाशाळांतून मौलिक शिक्षणाचे पाठ, व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग, क्रीडांगणे, कला-छंद वर्ग, प्रयोगशाळा इत्यादी असतातच त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना घेऊ देणे... त्यासाठी आई-वडील अन् शिक्षक यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यकच आहे. शालेय कार्यक्रमातून दिनविशेष, थोर नेत्यांच्या जयंत्या, राष्ट्रीय धार्मिक सण, सहली, स्पर्धा, परीक्षा असेही नानाप्रकारचे उपक्रम राबवले जातात, त्यांचा परिचय, त्यांची ओढ या नवीन मुलांना लावून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.
आजचे नागरिक तयार करण्यासाठी या बालकांना योग्य तो आकार देणे, त्यांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक चढ व विकास हा उचित मार्गाने घडविणे हे आत्ताच्या मोठ्या लोकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. ही निरागस, निष्पाप मुले खरोख्च 'मातीचा गोळा' असतात. त्याला योग्य आकार आपण दिला पाहिजे. अब्राहम लिंकन यांनीही बालकांवर योग्य संस्कार अले पाहिजेत, यावर मार्गदर्शन केले आहे. संस्कारक्षम वयातच पालकांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच नव्हे तर त्याचबरोबर देशाच्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलांना आजी-आजोबांचा लळा, प्रेम हे दिले पाहिजे. त्यातूनच एकमेकांबद्दल स्नेह निर्माण होत असतो .
आजूबाजूची ही प्रलोभने नको ते संस्कार या कोवळ्या मनावर घडवीत राहतात, त्या जाहिराती.
 बातम्या-चित्रपट यांचा बरोबर उलट परिणाम या मुलांवर होतो आणि ही मुले आळशी-चैनी-चंगळवादी बनण्याची शक्यता वाढते. तेव्हा त्यापासून पालक आणि शिक्षक, त्याचबरोबर समाजही मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तरच भविष्यकाळ आपला व त्यांचा उज्ज्यल राहील, काही वेळा मुले नाहक व्यसनात गुंतत जातात, निराश होतात. अशावेळी जर त्यांचे योग्य समुपदेशन झाले नाही. तर मुले हालची जातात. त्यांना सुधारणे अवघड होऊन बसते.
सुदृढ, सक्षम, निरोगी, व्यसनमुक्त, बुद्धिमान बालके ही त्या देशाची बलस्थाने असतात. प्रेम, श्रद्धा, कर्तव्य, चिकाटी,. कष्ट इ. अनेक गुणांचा संचय त्यांच्यात व्हावा म्हणून पालक, शिक्षक, समाज या सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे 'पराभव' हसत हसत स्वीकारण्याची आणि 'विजय' संयमाने साजरा करण्याची जाण त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच निश्चितपणे देशाचे भवितव्य हे उज्ज्वल होईल यात शंका नाही.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes