Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली

schedule28 Nov 24 person by visibility 31 categoryलाइफस्टाइल

मुंबई: महानगरातील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब स्थितीत पोहोचल्याचं समोर आलं आहे. सध्या मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 118 वर असल्याचं नोंदवलं गेलं आहे, जे ‘मध्यम’ श्रेणीत येत असलं तरीही आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. अभ्यासकांच्या मते, मुंबईसाठी प्रादेशिक एअरशेड धोरण राबवण्याची अत्यंत गरज आहे.

एका देशव्यापी अभ्यासानुसार, मुंबईसारख्या शहरांनी तटीय एअरशेड धोरणात समाकलित होण्याचा सल्ला दिला आहे. या प्रादेशिक एअरशेड धोरणाद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील प्रदूषणाच्या स्रोतांवर नियंत्रण मिळवता येईल. स्थानिक प्रदूषणाचे व्यवस्थापन करून प्रदूषण कमी करणे शक्य होईल, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

हिवाळ्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता अधिकच खालावते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023’ नुसार, जानेवारी 2023 मध्ये PM 2.5 या सूक्ष्म कणांच्या पातळीत 2022 च्या तुलनेत 23% वाढ झाली होती. यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक ठरली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये श्वसनविकार, हृदयविकार, तसेच इतर आजार होण्याचा धोका वाढतो. यावर प्रशासनाने तातडीने पावलं उचलत प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes