Maha Hit 24
Register

जाहिरात

 

वीरपत्नीला मिळाला मायेचा आधार

schedule31 Jul 25 person by visibility 9 categoryसामाजिक

लागेल तेवढे सिमेंट मोफत मिळाल्याने उभारले स्वप्नातील घर

बांगर सिमेंट कंपनीकडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना नवीन घर बांधणीसाठी मोफत सिमेंट

कोल्हापूर : कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाºया शहीद जवानांच्या कुटूंबियांसाठी ‘प्रोजेक्ट नमन’ ही योजना सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद वीर जवानांच्या कुटूंबियांना लाभ देण्यात आला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथील शहीद जवान महादेव बाळु तोरस्कार यांना २००१ साली अरुणालच प्रदेश येथे वीरमरण आले होते. त्यांच्या कुटूंबाला नवीन घरबांधणीसाठी लागेल तेवढे बांगर सिमेंट मोफत दिले आहे. यापुढेही १ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २०१९ दरम्यान शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबाला त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट बांगर सिमेंट कंपनीकडून मोफत दिले जात आहे. या कालावधीत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटूंबियांना घर बांधणीसाठी सिमेंट हवे असेल तर त्यांनी आमचेशी संपर्क साधावा. अशी माहिती बांगर सिमेंट कंपनीचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कंपनीचे सेल्स प्रमोटर सुहास परमणे, विभागीय अधिकारी सोमनाथ पाटील, राकेश जाधव आदी उपस्थित होते.

बांगर सिमेंट ही देशातील अग्रगण्य व तीन मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. देशातील सर्वांत वेगाने वाढणारी सिमेंट कंपनी म्हणून नावलौकीक आहे. श्री सिमेंट लि. चे अध्यक्ष एच. एम. बांगर यांच्या संकल्पनेतुन कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाºया शहीद जवानांच्या कुटूंबासाठी ‘प्रोजेक्ट नमन’ ही योजना सुरु केली आहे. आम्ही देशासाठी वीरमरण पत्करलेल्या प्रत्येक जवानाला नमन करतो. १ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २०१९ दरम्यान शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबाला त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट मोफत पोहच केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथील शहीद जवान महादेव बाळु तोरस्कार यांना २००१ साली अरुणालच प्रदेश येथे वीरमरण आले होते. त्यांच्या कुटूंबाला नवीन घरबांधणीसाठी लागेल तेवढे बांगर सिमेंट मोफत दिले आहे. बांगर सिमेंटने नुकतेच कर्नाटक व महाराष्ट्रात पुणे येथे उत्पादन सुरु केले आहे. त्यामुळे आपल्या भागात कोठे ही सिमेंट देता येते. १९९९ पासून ते आतापर्यंत कंपनीने ‘प्रोजेक्ट नमन’ या योजनेतून ८० हजारहुन अधिक सिमेंट बँग दिल्या आहेत. घर हे केवळ निवारा नसुन ते सन्मान व सुरक्षीततेचा महत्वाचा पाया आहे. बांगर सिमेंट परिवार शहीदांच्या कुटूंबासोबत उभा आहे. तसेच त्यांच्या कुटूंबाला आमचा नम्र पाठिंबा आहे. लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी व जवान डिलरशिपच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले आहेत. भीमराव शेळके-शाहुवाडी, राजेश देवणे-वडणगे, सतिश पाटील-वाशीनाका, संजय जांबीलकर-महाडिकवाडी, सर्जेराव खाडे-कूर आदींचा त्यामध्ये समावेश असल्याचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी सांगितले.  

वीरपत्नी श्रीमती वृषाली तोरस्कर यांनी सांगितले की, बांगर सिमेंटच्या डिलरकडून मला समजले की बांगर सिमेंट मोफत मिळते. तेंव्हा मी बांगर सिमेंटचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांना फोन केला. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेचं व पाटपुरावा ही केला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामधून सहकार्य मिळाले. मला सिमेंट मोफत मिळाले त्या बद्दल बांगर सिमेंट कंपनीचे मनापासून धन्यवाद मानते. या कंपनीकडून मला मोठ्या प्रमाणात हातभार लागला असल्याचे श्रीमती तोरस्कर यांनी भावना व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes