मार्गशीष गुरुवारच्या व्रताचे नियम माहित आहेत का ?
schedule12 Dec 24 person by visibility 27 category
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू होणारे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाणारे मार्गशीर्ष गुरुवार व्रत हा श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग मानला जातो. हे व्रत कन्या, सवाष्ण स्त्रिया तसेच पुरुष देखील करू शकतात. व्रताच्या नियमांनुसार, व्रत करणाऱ्यांनी विशिष्ट पद्धतीचे आचरण करणे आवश्यक आहे.
व्रताचे नियम:
- सुरुवात आणि उद्यापन: व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे.
- आहार मर्यादा:
- बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण आणि मांसाहार टाळावा.
- व्रत करणाऱ्या स्त्रियांनी फक्त पाणी, दूध, किंवा फळांचे सेवन करावे.
- रात्री कुटुंबासोबत मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे.
- पूजा व आचरण:
- पूजा करताना मन शांत, आनंदी व भक्तीभावाने परिपूर्ण असावे.
- घरातील वातावरण देखील सकारात्मक व प्रसन्न ठेवावे.
- विशेष प्रार्थना:
- स्त्रियांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा व कहाणी वाचावी.
- पुरुष भक्तांनी श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करावा.
- सहाय्य: जर स्वतः पूजा करणे अशक्य असेल, तर इतर भक्तांकडून पूजा करवावी, परंतु उपवास स्वतः करणे अनिवार्य आहे.
व्रताचे महत्त्व:
लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कुटुंबात संपत्ती, सुख-समृद्धी नांदावी म्हणून हे व्रत उपयुक्त मानले जाते. भक्तीभावाने आणि श्रद्धेने केलेले हे व्रत घरात आनंद आणि शांती आणते, असा विश्वास आहे.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही