पालक धपाटे कधी खाल्लेत का..? नसेल तर पटकन करा
schedule12 Jun 24 person by visibility 58 categoryखवय्येगिरी
साहित्य:
अडीच वाट्या कणिक
एक वाटी ज्वारीचे पीठ
अर्धी वाटी डाळीचे पीठ
मीठ
दोन चमचे तिखट
पाव चमचा हळद
एक चमचा जिरेपूड
दोन चमचे वाटलेला लसूण
एक चमचा ओवा पूड
तेल
अर्धी पालकाची गड्डी
दोन चमचे तीळ
कृती:
पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा त्यानंतर कणीक, ज्वारीचे पीठ, डाळीचे पीठ, मीठ, तिखट, हळद, जिरेपूड, ओवा पूड, वाटलेला लसूण, तीळ घालून सगळं एकत्र मिसळावं त्यात चिरलेला पालक आणि आवश्यक तेवढे पाणी टाकून पीठ मळावं आणि धपाटे लाटून घ्यावेत.