घरच्या घरी बनवा चीज रोल
schedule30 May 24 person by visibility 89 categoryखवय्येगिरी
चीज रोल म्हण्टलं प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. कधी एकदा खाईन असं होतं. खाता येतं पण करता येत नाही . असं बरेच लोकांचं आहे ना. पण मी आज खास तुमच्यासाठी घरच्या घरी क्र्ट्स यरील अशी मस्त चीज रोल रेसिपी घेऊन आले आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा.
चीज रोल ही एक स्वादिष्ट आणि सोपी स्नॅक रेसिपी आहे. चला तर मग चीज रोल कसे बनवायचे ते पाहूया.
साहित्य:
६-८ ब्रेड स्लाइसेस
१ कप किसलेले चीज (मोझरेला किंवा चेडार)
१/२ कप बारीक चिरलेली शिमला मिरची
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टीस्पून मिरी पावडर
१/२ टीस्पून मीठ (चवीनुसार)
२-३ टेबलस्पून बटर किंवा तूप
हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस (डिपसाठी)
कृती:
सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
किसलेल्या चीजमध्ये बारीक चिरलेल्या भाज्या, मिरी पावडर आणि मीठ मिसळा.
ब्रेड स्लाइसच्या कडा काढून टाका.
ब्रेड स्लाइसला थोडेसे लाटून घ्या, म्हणजे ते थोडे सपाट होतील.
प्रत्येक ब्रेड स्लाइसच्या एका टोकाला चीज आणि भाज्यांचे मिश्रण ठेवा.
ब्रेड स्लाइस हळूवार रोल करा आणि कडा थोडे पाणी लावून चिकटवा जेणेकरून रोल उघडणार नाहीत.
तव्यावर थोडे बटर किंवा तूप गरम करा.
तयार रोल्स तव्यावर ठेवून सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा. तुम्ही हे डीप फ्राय देखील करू शकता.
सर्व्हिंग:
तयार चीज रोल्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
हे चीज रोल्स कधीही खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत आणि बनवायला खूप सोपे आहेत.