Maha Hit 24
Register

जाहिरात

 

गोकुळ कडून नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना एक लाखाचा धनादेश

schedule29 Aug 24 person by visibility 73 categoryखेळ

पॅरिस ओलंपिक 2024 नेमबाजी मध्ये कालचे पदक मिळवल्याबद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मार्फत एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या रकमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसनमुश्री यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक यांच्या उपस्थितीमध्ये स्वप्निल चे वडील सुरेश कुसाळे व आई अनिता कुसाळे यांच्याकडे बामणी (ता कागल) येथे गोकुळच्या वतीने शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी आयोजित कागल तालुका संपर्क सभेमध्ये प्रदान करण्यात आला.

  स्वप्नील यश हे अभिमानास्पद असून भविष्यात स्वप्नील यशाची अनेक शिखरे गाठेल,देशाचे नाव उज्वल करेल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळी यांनी गोकुळ परिवारातर्फे स्वप्नील शुभेच्छा देऊन गोकुळने नेहमी जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले असून भविष्यात ही कार्य चालू राहील असे मनोगत व्यक्त केले.

स्वप्निल ला मिळालेले हे यश त्याचे प्रामाणिक कष्ट, मित्रमंडळीचे सहकार्य, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच हितचिंतकाच्या आशीर्वादामुळेच मिळाले असल्याचे स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी सांगितले तसेच गोकुळ परिवाराचे ऋण व्यक्त केले.

 या कार्यक्रमा वेळी उपस्थित वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले, अभिजीत तायशेटे, अजित नरके,नवीद मुश्रीफ, शशिकांत पाटील (चुयेकर), किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे ,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, भैयाजी शेळके, अंबरीसिंह घाडगे, बाळसो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व संघाचे अधिकारी आदी तसेच दूध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes