शपथविधी सोहळ्याला उरले अवघे काही तास
schedule09 Jun 24 person by visibility 76 categoryलोकसभा निवडणुक
दिल्ली : रविवार रोजी आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले असताना राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. अशात कुणाला कोणतं खातं मिळणार याची देशभर चर्चा होतेय.
महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, अशी माहिती आहे. गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. शिक्षण आणि संस्कृतिक ही मंत्रालय भाजप खासदारांकडे दिलं जाणार आहे. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पद मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या घरी 47 नेते पोहोचले आहेत. तिथे बैठक होत आहे.