Maha Hit 24
Register

जाहिरात

 

सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले

schedule05 Nov 24 person by visibility 45 categoryलाइफस्टाइल

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार असून, यामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना, तर भाजपकडून सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांना खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जयश्री पाटील यांनी सांगलीत भव्य शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. या सभेला खासदार विशाल पाटील आणि त्यांचे भाऊ प्रतीक पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, "मी सर्वांची क्षमा मागतो, जयश्री पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदम आणि आम्ही कमी पडलो. आमच्या वसंतदादा कुटुंबाला काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. आमच्या घराण्यावर सातत्याने अन्याय होत आहे. मी अपक्ष खासदार असूनही महाविकास आघाडीसोबत आहे. मात्र काँग्रेसचा अधिकृत उमेदवार भाजपला हरवण्यास सक्षम नसल्याने आम्ही जयश्री पाटील यांना आपले उमेदवार मानतो."

विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरील नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्या मतदारांना आवाहन केले की जयश्री पाटील या त्यांच्याच उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून द्यावे. त्यांच्या या निर्णयामुळे सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीच्या योजना गडबडीत आल्या असून, काँग्रेसला आता मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes