थंडीत कोणते कपडे वापरणे योग्य आहे..?
schedule12 Jun 24 person by visibility 218 categoryआरोग्य
आता पावसाळा सुरु होईल थंडीही वाजायला सुरुवात होईल मग अशा वेळी उबदार कपडे घालणे खूप गरजेचे असते. पावसाळा सुरु असल्यामुळे कडाक्याची थंडी जावणतेय. अशा गारव्यात त्वचा तसेच शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी योग्य कपडे असणे गरजेचे आहे. स्टाईलिश लूक तसेच थंडीपासून संरक्षण देणारे काही कपडे ट्राय करता येतील.
पावसाळ्यात कॅज्यूअल कपड्यांसोबत डेनिम जॅकेट परिधान केले जाऊ शकते. हा आऊटफीट अतिशय स्टाईलिश दिसतो. डेनिम जॅकेटला ट्रेंडी वुलन क्रॉप टॉप तसेच टी शर्टसोबत ट्राय करता येते.हिवाळ्यात स्वेटर घालणे आवडत असेल तर लूज आणि स्टायलिश स्वेटर हा एक पार्याय असू शकतो. असा लूक स्टाईलिश वाटतो. तसेच स्वेटरमुळे शरीरात गर्मीदेखील राहते. फ्रील स्टाईल स्वेटर, स्टाईलिश स्लीव्ह्स असणारे स्वेटर परिधान करता येतात.थंडीमध्ये एखाद्या पार्टीमध्ये सामील व्हायचे असेल तर कोणता ड्रेस परिधान करावा असा प्रश्न पडतो. मात्र वुलन लॉंग ड्रेस पार्टीसाठी छान दिसतो. यासोबत शॉर्ट जॅकेटसुद्धा वापरले जाऊ शकते.बाहेर थंडी असताना एखाद्या लग्नसमारंभात सामील व्हायचे असेल तर साडीवर मॅच करणारा एखादा ओव्हरकोट परिधान केला जाऊ शकतो. यामुळे ट्रॅडिशन लूकला एक मॉडर्न टच मिळतो