गाईच्या डोहाळे जेवणाची हातकलंगलेत चर्चा
schedule04 Dec 24 person by visibility 238 categoryलाइफस्टाइल


कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे )
कुंभोज तालुका हातकलंगले येथे तात्यासाहेब हाराळे यांच्या घरी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आज परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या देशी गाईचे डोहाळे जेवण केले.
या डोहाळे जेवणामध्ये हिंदू परंपरेनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्यात आल्या यामध्ये गाईची पूजा ओटी भरण त्याच पद्धतीने महिलांना बोलवून भोजनाचा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमाची चर्चा कुंभोज परिसरात होत असून सध्या कुंभोज परिसरात चर्चेचा विषय बनत आहे.विनोद शिंगे कुंभोज