24 वर्ष अविरत शिक्षण सेवेची
schedule04 Sep 24 person by visibility 130 categoryशैक्षणिक
24 वर्ष अविरत शिक्षण सेवेची, आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांसह पालक वर्गात खास ओळख निर्माण केलेले सर्व विद्यार्थी व पालक व्यवस्थापनाचे आणि प्रेरित करण्याची क्षमता बाळगणारे गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असणारे माननीय अशोक बाळकू नाईक यांना स्पीड न्यूज 24 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय.
अशोक नाईक 24 वर्ष अविरतपणे शिक्षण क्षेत्रातील ग्रामविकास शिक्षण परिषद या संस्थेत कार्यरत आहेत. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1972 चा असून त्यांनी बीए बीएड हे शिक्षण पूर्ण केलंय. अशोक नाईक त्याने ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर या संस्थेच्या गगनबावडा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तिसंगी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास विद्यालय सडूरे - अरुळे , त्याचबरोबर वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय करूळ, आणि गगनबावडा तालुक्यातील दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तिसंगी या शाखांमध्ये एक उत्कृष्ट सहाय्यक शिक्षक म्हणून आपला कार्यभार सांभाळला. आपल्या जीवनाची 24 वर्ष शिक्षण सेवेत समर्पित केलेल्या माननीय अशोक नाईक यांना सलाम.