32 शिराळा प्रीमियर लीग-2024 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
schedule08 Apr 24 person by visibility 188 categoryक्रीडा
नवी मुंबई : कोपर खैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर संपन्न झालेल्या शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मानसिंगराव नाईक पुरस्कृत "32 शिराळा प्रीमियर लीग-2024" चे बक्षीस वितरण समारंभ खासदार सुप्रियाताई सुळे व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धामवडेच्या अरुणदादा मोहिते यांचा संघ 2024 च्या शिराळा प्रिमियर लीगचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. रांजणवाडीचा साई दत्त वारियर्स संघ उपविजेता ठरला. एम. व्ही. टायगर्स, चरण यांनी तिसरा, तर एस. डी. लायन्स, शिरसटवाडी यांनी चौथा क्रमांक पटकावला. यावेळी डॉ. दिनेश म्हात्रे, पृथ्वीसिंग नाईक, आशिष आचरे, भरत सावंत, प्रकाश पाटील, सुरेश राजवन, सुरेश पाटील, विजय पाटिल, महेश शेडगे, युवराज पाटिल, संजय पाटिल, सुनील पाटील, अमर मराठे , 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे संदीप पाटील, सुनील चव्हाण, विशाल नायकवडी, सचिन चव्हाण यांच्यासह सहभागी इतर संघ, खेळाडू व मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी आदी उपस्थित होते.