नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी
schedule13 Jun 24 person by visibility 125 categoryनोकरी

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड यांच्याकडून ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागतील. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया एकून 39 जागांसाठी सुरू आहे. प्रक्रिया सहाय्यक श्रेणी - I (नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडर) ची पदे भरली जातील. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, पल्प अँड पेपर, सिव्हिल, केमिस्ट्री, अकाउंट्स असिस्टंट अशी वेगवेगळी पदे भरली जातील.