Maha Hit 24
Register

जाहिरात

 

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय शिक्षक

schedule04 Sep 24 person by visibility 155 categoryशैक्षणिक


निस्वार्थ भावना, निष्ठेने सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट काम करणारे मा. उदय उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळज चे मुख्याध्यापक माननीय अशोक ज्ञानू पाटील यांना स्पीड न्यूज 24 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय. पाटील यांची एक कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ओळख आहे. 

अशोक पाटील यांच्या शिक्षण बीए बीएड झाले असून ते सध्या आसळज येथील मा उदय उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपली मुख्याध्यापक पदाची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल केलय. त्यांची विद्यार्थ्यांमध्ये एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय शिक्षक अशी ओळख आहे. शिस्तीसोबतच आपल्याला लागवी आणि प्रेमळ स्वभावाने पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनात घर केलय. 

शैक्षणिक कार्यासोबतच अशोक पाटील यांनी सामाजिक कार्यातही आपला मोलाचा ठसा उमटवलाय. 1991 मध्ये त्यांनी श्रीराम क्रीडा मंडळ मंजूर पैकी पाटील वाडी या मंडळाचे संस्थापक म्हणून कार्यभार सांभाळला, तसेच 2002 मध्ये श्री शंकर धोंडी सहकारी सेवा संस्था पाटील वाडीचे संस्थापक, ग्रामदैवत रामेश्वर मंदिराच्या बांधकाम कमिटीचे अध्यक्ष, त्याचबरोबर श्री ज्योतिर्लिंग दूध संस्था पाटील वाढीचे संस्थापक चेअरमन असा अनेक पदांचा कार्यभार सांभाळत ते आपल्या मुख्याध्यापक पदाची कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्याचबरोबर तंबाखू मुक्त अभियान, साक्षरता अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सुंदर शाळा अभियान अशा विविध अभियानांमध्ये ते स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत असतात. अशा कर्तव्यदक्ष आणि शैक्षणिक कार्यासोबतच समाजकार्याची जाण ठेवणारे मुख्याध्यापक अशोक पाटील त्यांच्या कार्याला सलाम.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes