कमजोर कमकुवत मनाचे रक्षण करणारा रक्षण कर्ता सक्षम पाहिजे; शिल्पा बहणजी
schedule17 Aug 24 person by visibility 131 categoryआरोग्य
वर्तमान समयी झालेल्या मनुष्याच्या कमजोर कमकुवत मनाचे रक्षण करणारा रक्षण कर्ता व पाच विकारांच्या बंधनांमधून मुक्त करणारा स्वयं मुक्तिदाता निराकार परमात्मा शिव या धरतीवरती अवतरीत झालेले आहेत .ज्यांच्या सानिध्यामध्ये राहून आपण कसे आपलं जीवन तणावमुक्त , व्यसनमुक्त, चिंतामुक्त बनवू शकतो याची सहज विधी शरद सहकारी साखर कारखाना नरंदे
येथे उपस्थित ऑफिस स्टाफ कर्मचाऱ्यांंसमोर कुंभोज सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय शिल्पा बहनजी बोलत होत्या.
रक्षाबंधनाच्या औचित्य साधून त्यांनी रक्षाबंधनाचा खरा अध्यात्मिक अर्थ सर्वांसमोर मांडला व गिफ्ट रूपामध्ये व्यसनांचं दान करण्यास अनेकांना प्रेरित केलं.
यावेळी चंदा बहनजी यांनी ब्रमह्माकुमारी विद्यालयाचा खूप सुंदर मोजक्या शब्दांमध्ये परिचय करवून दिला.यावेळी आप्पासाहेब चौगुले संचालक , भोपाल आवटी मुख्य कार्यकारी अधिकारी, दीपक पाटील मुख्य शेती अधिकारी , रमेश गंगाई मुख्य शेती अधिकारी , विश्वनाथ पाटील लेबर ऑफिसर विलास कदम सुरक्षा अधिकारी मनोहर कुलकर्णी वेहिकल इन्चार्ज , सचिन पाटील विजय सुमारे महावीर सेनापुरे धनंजय पाटील आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . कुंभोज मधून खास प्राथमिक कन्या विद्यामंदिर कुंभोज शाळेचे माजी मुख्याध्यापक आरगे गुरुजी , अण्णा शिंदे व अभिजीत आरगेही या कार्यक्रमास उपस्थित होते .