विद्यार्थीप्रिय शिक्षक; मा. बाळासो रायनाडे
schedule04 Sep 24 person by visibility 76 categoryशैक्षणिक
तल्लख बुद्धिमत्ता, शिक्षणाचा ध्यास, अविश्रांत अभ्यास , यांच्या जोरावर विज्ञान आणि गणित विषयांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळवणारे तसेच समाजकार्याचे भान जपत वेळोवेळी लोकांना मदत करणारे, एक क्रियाशील व उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित असणारे इचलकरंजीतील श्रीमंत गंगाबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक माननीय बाळासो बाबासो रायनाडे यांना स्पीड न्यूज 24 कडून दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय.
बाळासो रायनाडे त्यांचे बीएससी बीएड शिक्षण झाले असून कुठे गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर सलग पंधरा वर्षे एन एम एम एस परीक्षेमध्ये एकूण 100 गुण अधिक विद्यार्थिनींना स्कॉलरशिप प्राप्त करून दिली आहे. ते नेहमीच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांमध्ये उस्फूर्त सहभाग घेत असतात. त्याचबरोबर अप्रगत विद्यार्थिनींना गणित आणि विज्ञान विषयांमध्ये मोलाचे मार्गदर्शन करतात. विद्यार्थिनींना त्यांच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी आणि माया जाणवते.
त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित झाले. बाळासो रायनाडे यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचे भान जपत अनेक समाजकार्य केली आहेत, रायनाडे यांनी अकिवाट गावात पूरग्रस्तांना रत्नदीप मंडळाच्या माध्यमातून धान्य वाटप करून एक मदतीचा हात दिला. तसेच अजून कुठेही गरजू लोकांना मदतीची गरज असेल तर ते मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. बाळासो रायनाडे हे सध्या वीर सेवा दल शाखा अक्किवाट येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर बाळासो रायनाडे यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्य जपणाऱ्या अशा या आदर्श शिक्षक जाहीर झालेल्या बाळासो बाबासो रायनाडे यांच्या कार्याला सलाम.