Maha Hit 24
Register

जाहिरात

 

तीन दिवसांपासून बेपत्ता महिला सापडली अजगराच्या पोटात

schedule09 Jun 24 person by visibility 225 categoryआंतरराष्ट्रीय

मुंबई : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली इंडोनेशियन महिला अजगराच्या पोटात मृतावस्थेत आढळल्याने आल्याने महिलेच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसला.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, एएफपी वृत्तसंस्थेला एका स्थानिक अधिकाऱ्याने शनिवारी(८जून) ही माहिती दिली.फरीदा (४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावातील ती रहिवासी आहे.तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती.महिलेचा पती आणि रहिवाशांनी तिचा शोध घेतला असता शुक्रवारी (७ जून) एका अजगराच्या पोटात मृतावस्थेत आढळून आली.अजगराची लांबी मोजली असता सुमारे ५ मीटर (१६ फूट) इतकी होती.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes