तब्येत बरी नसतानादेखील IPL मॅचनंतर शाहरुखची 'ही' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन व्हिडिओ होतोय व्हायरल
schedule23 May 24 person by visibility 99 categoryमनोरंजन
अभिनेता शाहरुख खानची काल तब्येत बिघडल्याने त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयपीएल प्ले ऑफ सामन्यानंतर तो ऍडमिट झाला. शाहरुखला गर्मीचा फटका बसल्याने डिहायड्रेशन झाले आणि त्याची तब्येत बिघडली.आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो बरं नसतानाही एक दिव्यांग चाहत्याशी थांबून गप्पा मारत आहे.
शाहरुख खान किती मनमिळाऊ स्वभावाचा आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. अहमदाबाद येथे के के आरची फायनल पार पडल्यानंतर शाहरुख खानला अस्वस्थ वाटले. उन्हाचा त्याला खूप त्रास झाला. फायनलनंतर शाहरुख स्टेडियममधून बाहेर पडत असताना व्हीलचेअरवर बसलेला एक दिव्यांग चाहता त्याला दिसला. त्या चाहत्यान शाहरुखला थांबवलं आणि तो त्याच्याशी गप्पा मारु लागला. शाहरुखनेही त्याला वेळ दिला त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्यासोबत फोटोही काढला. बरं नसतानाही शाहरुखने केलेली ही कृती पाहून सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शाहरुख खानला काल अस्वास्थ्यामुळे अहमदाबादच्या के डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची पार्टनर आणि अभिनेत्री जुही चावलाने शाहरुखची भेट घेतल्यानंतर त्याचे हेल्थ अपडेट दिले. २१ मेरात्रीपासून शाहरुखला अस्वस्थ वाटत होतं. परंतु, सध्या त्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे. काल संध्याकाळपासून त्याच्या प्रकृतीत जरा सुधारणा जाणवत आहे. जर देवाच्या मनात असेल तर लवकरच तो बरा होईल. आणि, विकेंडच्या दिवशी स्टँड्समध्ये उभा राहून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीमला चिअर करतांना दिसेल, असं जुही म्हणाली.