Maha Hit 24
Register

जाहिरात

 

ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी अखिलेश चौगुले

schedule26 Aug 24 person by visibility 99 category


कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

कुंभोज गावच्या शिरपेच्या पुन्हा एकदा मानाचा तोरा इचलकरंजी ताराराणी आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अखिलेश बाबासाहेब चौगुले यांची निवड . आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते अखिलेश चौगुले यांचा जवाहर सहकारी साखर कारखान्यावर सत्कार करण्यात आला तसेच कुंभोज महाविकास आघाडीच्या वतीने कुंभोज ग्रामपंचायत येथे सरपंच स्मिता चौगुले व उपसरपंच अशोक आरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         
इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. या नवनियुक्त विद्यार्थी संघटना कार्यकारीणी विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले. यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते व कु. सानिका आवाडे यांच्या उपस्थितीत युवा नवनियुक्तांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes