महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
schedule16 Aug 24 person by visibility 141 categoryआरोग्य
सन 2024-25 या अर्थिक वर्षाचे उदिष्ट्य साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदू-खाटीक, वाल्मियकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम, भंगी या प्रवर्गामधील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एम.पवार यांनी केले आहे.
अनुदान योजनेचे उद्दिष्ट- भौतिक 80, आर्थिक अनुदान 8 लाख रुपये. ही योजना 50 हजार पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये अनुदान म्हणून तर 25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज लाभार्थ्यांला दिले जाते.
बीजभांडवल योजनेचे उद्दिष्ट - भौतिक 80, आर्थिक अनुदान 8 लाख रुपये व बीजभांडवल 40 लाख रुपये. ही योजना 50 हजार ते 5 लाखापर्यंत असून बँकेची 75 टक्के रक्कम व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के याप्रमाणे आहे. महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के व 50 हजार रुपये अनुदानचा समावेश आहे.
थेट कर्ज योजना उद्दिष्ट- भौतिक 26, आर्थिक अनुदान 13 लाख व बीजभांडवल 11.70 लाख रुपये. ही योजना 1 लाख रुपयांची असून महामंडळाची बीजभांडवल रक्कम 75 हजार रुपये असून अनुदान 20 हजार रुपयांपर्यंत दिले जाते. यामध्ये लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.
प्रशिक्षण योजना उद्दिष्ट - भौतिक 80, आर्थिक 24 लाख रुपये. ही योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यवसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत (3 महिन्या पर्यंत) मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
वरील सर्व योजनांसाठी वर नमुद प्रर्वगातील लोकांना तसेच ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य असणार आहे. आधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पीटल शेजारी जिल्हा कार्यालय, कोल्हापूर 416003 फोन नं 0231-2663853 वर संपर्क साधावा.