१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? कुणाचा घणाघात?
schedule31 Oct 24 person by visibility 54 categoryलाइफस्टाइल
लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांवर मोठा फटका बसला होता, तर आता विधानसभेत समीकरणं बदलण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. यावेळी त्यांनी दलित, मुस्लिम, आणि मराठा समाजाचं ऐक्य बांधण्याची घोषणा करत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर मोठा परिणाम होईल, असा दावा केला आहे.
मनोज पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचं नाव न घेता राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "तुम्ही १५०० रुपये देऊन जनतेची नादी लावत आहात का? आता परिवर्तन होणार आहे, सहन करण्याची क्षमता संपली," असे त्यांनी सांगितले. सुपडा साफ करणार म्हणजे करणारच. आता सोडणार नाही," असे कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, आम्हाला चिन्ह मिळाल्यावर अधिक बोलू, पण आता समाजाचे प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे." या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.