या गोष्टीसाठी निवडणूक आयोगाकडून मनाई
schedule18 Nov 24 person by visibility 102 categoryविधानसभा

कोल्हापूर; दि. २० रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शांतता कालावधी सोमवार १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायं. ६ वाजल्यापासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध माध्यमांनी मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या, निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.
दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.