Maha Hit 24
Register

जाहिरात

 

विजयाच्या इतक्या जवळ असताना; मारो मुझे मारो फेम पाकिस्तानच्या पराभवानंतर भडकला

schedule10 Jun 24 person by visibility 86 categoryक्रीडा

मुंबई: टी-20 विश्वचषकात काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या जवळ होता. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

पाकिस्तानच्या या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमसह इतर खेळाडूंवर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हारयरल होत आहे. ‘मारो मुझे मारो’ या वाक्यामुळे अधिक प्रसिद्ध असलेला मोमिन साकिब सुद्धा सामना पाहण्यााठी काल गेला होता. तिथून त्याने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. विजयाच्या इतक्या जवळ असताना तुम्ही पराभूत कसे होऊ शकतात. विजयाची तयारी केली असताना कसे काय पराभूत होऊ शकतात?, हा सामना हातात होता...मग why, why, why? त्यानंतर मैदानात उपस्थित असणारा एक पाकिस्तानचा चाहता मोमिन साकिबला   समजवण्यासाठी येतो. मात्र मोमिन साकिब त्यावरही चिडतो, रागवतो आणि त्याचं शर्ट फाडतो. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes