धैर्यशील मानेंनी मारली बाजी
schedule04 Jun 24 person by visibility 98 categoryलोकसभा निवडणुक
हातकलंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्तेचे पाटील यांना पराभूत केले. शिवसेनेच्या विभाजनानंतर ठाकरे गटाला मिळालेली सहानभूती आणि काँग्रेसने दिलेले ताकद आणि एक नवीन चेहरा म्हणून सत्यजित पाटील यांना जनतेचा कौल मिळेल असेवाटत होते, पण सर्व राजकीय तज्ञ आणि एक्झिट पोलचा अंदाज खोडून काढत खासदार माने यांनी मताधिकांमध्ये पंधरावे फेरीनंतर वाढ होत गेली. परिणामी मशाल प्रभावहीन ठरली असून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची पुन्हा एकदा शिट्टी वाजलेली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी, इस्लामपूर, शिराळा मतदारसंघाचा समावेश आहे. हा लोकसभा मतदारसंघ ऊस पट्ट्यात येत असल्यामुळे ऊस दर चळवळीच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. 2009 च्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी चार लाख 81 हजार ०२५ मते घेऊन तर 2014 च्या निवडणुकीत सहा लाख 40 हजार 428 मते घेऊन विजयी झाले होते. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी पुन्हा परस्परविरोधात मैदानात उतरले असले तरी या दोघात महा विकास आघाडीने सत्यजित पाटील यांच्या माध्यमातून तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला त्यामुळे प्रथमदर्शनी दुरंगी वाटणारी निवडणूक तिरंगी झाली यामध्ये खासदार माने यांनी सलग दुसऱ्या वेळेस बाजी मारली आहे.