अर्थसंकल्पामुळे सोने-चांदीत मोठी घसरण
schedule23 Jul 24 person by visibility 80 categoryउद्योग
मुंबई : एनडीएच्या नेतृत्वातील पंतप्रधान मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. यात त्यांनी सोने - चांदीच्या दरात मोठी कपात केली. यामुळे राज्यातील सोने-चांदीची प्रमुख बाजारपेठ जळगाव आणि पुणे येथे घटलेल्या दरांचे परिणाम बाजारपेठेत दिसून आले आहे.
केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ केली होती. कस्टम ड्युटी 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आज केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी सीमा शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून 6 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसली. सोने जवळपास 2 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. बजेट संपताच लागलीच सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1988 रुपयांपर्यंत खाली आली. या घसरणीनंतर सोने 70730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले.
चांदीच्या किंमतीत बजेट संपल्यानंतर मोठी घसरण दिसली. चांदीच्या किंमतीत प्रति किलो 2429 रुपयांची घसरण दिसली. बजेट संपल्यानंतर चांदीची किंमत 86774 रुपये प्रति किलोवर आल्या. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होण्याची सराफा दुकानदारांची अपेक्षा आहे. जर सोने आणि चांदीची मागणी वाढली तरी किंमतीत बदल दिसू शकतो.