निलेश लंके यांना मोठा धक्का; पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा.....
schedule06 Jun 24 person by visibility 157 categoryलोकसभा निवडणुक
मुंबई : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला. आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांच्या या विजयाला अवघे दोन दिवसही उलटत नाहीत तोच त्यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला आहे. राहुल झावरे यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पारनेर येथील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय १० ते १२ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड करून राहिल यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच नगर येथे त्यांना हलवण्यात येणार आहे.
निलेश लंके हेही लवकरच राहुल यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या हल्ल्यामुळे गावातील वातावरण अतिशय तापलं असून तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र हे हल्लेखोर नेमके कोणे होते, राहुल यांच्यावर हा हल्ला का झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.