भाऊ कदम यांचा मोठा निर्णय
schedule05 Nov 24 person by visibility 99 categoryलाइफस्टाइल

मुंबई : राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडमोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यातच आता अभिनेता भाऊ कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यांच्या भेटीवर आता भाऊ कदम यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
त्यांनी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं आहे, ‘अजितदादांच्या पक्षाचा प्रचार करायला मला आवडेल, एकच दादा अजित दादा आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायला मला आवडेल. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, आणि त्यांनी आमचे कलाकारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, असं भाऊ कदम यांनी म्हटलं आहे.
