Maha Hit 24
Register

जाहिरात

 

घरफोडी करणारा अट्टल चोरटा जेरबंद

schedule22 Oct 24 person by visibility 62 categoryगुन्हे

इचलकरंजी: सांगली - कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणारा अट्टल चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यातील आरोपी प्रेमचंद उर्फ टल्या राहुल कांबळे राहणार दावत नगर कबनूर यांच्याकडून पोलिसांनी चोरलेले दागिने जप्त केले. आहेत व त्याला अटक करण्यात आले तसेच यातील त्याचा दुसरा साथीदार यश बगाडे राहणार आसारा नगर हा सध्या फरार आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस नगर पोलीस करत आहेत.  

इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडीच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती रात्री दिवसा कधीहि चोरटे घर फोडून घरातील दागिने रोख रक्कम लंपास करत होते याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आदेश होते ज्या ठिकाणी घरफोडी होत आहेत त्या ठिकाणी गस्त वाढवावी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासा याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून कबनूर दावत नगर येथील प्रेमचंद उर्फ टल्या राहुल कांबळे यांनी इचलकरंजी कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये घरफोडी केल्याची खबऱ्याद्वारे माहिती मिळाली पोलिसांनी पोलिसांनी प्रेमचंद कांबळे याला ताब्यात घेऊन अधिक तपास केले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी इचलकरंजी शिवाजीनगर हद्दीतील एक घर शहापूर पोलीस स्टेशन हद्दीतील व सांगलीतील व शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील अशा चार घरफोड्या केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रेमचंद कांबळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर यातील त्याचा दुसरा आरोपी यश बागडे राहणार आसरा नगर इचलकरंजी हा सध्या फरार आहे त्याचाही शोध शिवाजीनगर पोलीस स्टेशन घेत आहे अजून या दोघांनी आणि कुठे घरफोड्या केल्या आहेत का याचा शोध मात्र पोलीस घेत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील साहेब फौजदार रावसाहेब कसेकर अनिल चव्हाण सुनील बाईत विजय माळवदे सुकुमार बरगाले अरविंद माने, अविनाश भोसले सतीश कुंभार पवन गुरव व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला गजाआड केले आहे अधिक तपास पोलीस करत आहेत

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes