Maha Hit 24
Register

जाहिरात

 

पैजारवाडीत चिले महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

schedule26 Aug 24 person by visibility 86 categoryखेळ


देवाळे : प्रभाकर पाटील 

श्री.क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथे पं.पू.सद्गुरू चिले महाराजांची १०२वी जयंती जन्मशतकोत्तर सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गोकुळ अष्टमी सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी श्री"अभिषेक,त्रिकाल आरती, सामूहिक चिले महात्म्य वाचन, श्री जन्मकाळ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी दिली.

प्रतिवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र पैजारवाडी येथील पं. पु.सद्गुरू चिले महाराजांचे प्रमुख शक्ती पीठ कासवकृती समाधी मंदिरात श्री चिले महाराजांची जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी दोन वाजता जन्मोत्सव सोहळा संपन्न होत असून श्री जन्मकाळ संपन्न होईल, यावेळी पुष्पवृष्टी झाल्यानंतर पाळणा व सुंठवडा प्रसाद वाटप होईल. 
  
पहाटे काकड आरती,सकाळी "श्री"ना अभिषेक,त्रिकाल आरती,त्रिकाल आरती, सामूहिक चिले महात्म्य,गुरुचरित्र वाचन व जप,रोज ,रात्री भजन, अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी श्रीभक्तांनी या चिले महाराज जन्म उत्सवात मनोभावें सहभागी होऊन "श्री "दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने प्रसाद व भक्तनिवास बांधकाम सुरू आहे त्यासाठी भक्तांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन ही संस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
 
यावेळी मंदिर व्यवस्थापकीय विश्वस्त बाबुराव गराडे,सचिव विनायक जाधव, विश्वस्त बी. के.घोसाळकर,चंद्रप्रकाश पाटील(खुटाळे),जयंशिग पारखे,मोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सद्गुरु चिले महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या जेऊर गावांमध्ये जयंतीनिमित्त निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवार २५ रोजी कोल्हापूर ते पैजारवाडी सद्गुरु चिलेदेव पायी पालखी सोहळ्याचे भैरवनाथ मंदिर येथे सायंकाळी झाले त्यानंतर आरती, महाप्रसाद वाटप होणार करण्यात आले. सोमवारी दिनांक २६ रोजी सेवक महेश पेडणेकर लिखित ग्रंथाचे प्रवचन होणार आहे व सद्गुरु चिले महाराज शक्तिपीठ असणारी भैरवनाथ मंदिर व जन्मस्थान असणाऱ्या श्री बुराण यांच्या घरी जन्मोत्सव संपन्न होणार असून त्यानंतर पायी पालखी सोहळ्याचे पैजारवाडीत सांगता होणार आहे अशी माहिती भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes