Maha Hit 24
Register

जाहिरात

 

कोल्हापूर येथे सर्व पॉवरलिफ्टींग खेळाडूंसाठी निवड चाचणीचे आयोजन..

schedule22 May 24 person by visibility 127 categoryक्रीडा

कोल्हापूर: सब ज्युनिअर ,ज्युनिअर, सिनियर, मास्टर्स जिल्हास्तरीय इक्कीपड पॉवरलिफ्टींग व राज्य निवड चाचणी २०२४ ही स्पर्धा २८ मे रोजी होणार आहे. पॉवरलिफ्टिंगची ही स्पर्धा सर्व पॉवरलिफ्टींग खेळाडूपर्यंत पोहचवण्यासाठी प्रेस चे आयोजन करण्यात आले होते. ही प्रेस कोल्हापूर जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग असोशियन तर्फे दिनांक २२ मे रोजी कोल्हापूर इथे पार पडली. 

     या स्पर्धेमध्ये सर्व प्रकारातील स्ट्रॉंग मेन/स्ट्रॉंग वूमन पुरस्कार ते निवडले जाणार आहेत, व त्यांना प्रशस्तीपत्र बेल्ट व ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश पी 250 रुपये इतकी असणार आहे या स्पर्धेत विजयी झालेले खेळाडूंमधून दिनांक 30 व 31 मे दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर ज्युनिअर सीनियर मास्टर्स स्पर्धेमध्ये जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. तसेच यावेळी आपल्या जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव पॉवरलिफ्टिंग या खेळाच्या माध्यमातून उंचावले आहेत अशा सर्व खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजकांच्या मार्फत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर "पॉवरलिफ्टिंग मध्ये करियरच्या भरपूर संधी देखील त्यामुळे पालकांनी आपल्या पल्ल्यांना पॉवरलिफ्टिंग या खेळासाठी उत्तेजित केले तरी चालेल" असे इंटरनॅशनल पॉवरलिफ्टर सोनल सावंत या म्हणाल्या. तसेच खेळाविषयी संपूर्ण माहिती दिली खेळासाठी योग्य वय , योग्य वजन, याबद्दल सर्व माहिती देण्यात अली. 

     यावेळी नॅशनल पॉवरलिफ्टर सुजित कुडाळकर, इंटरनॅशनल पॉवरलिफ्टर सोनल सावंत, बॉडी बिल्डर आकाश कवडे अदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes