डोंगराळ, दुर्गम भागात अविरत समाजकार्य
schedule04 Sep 24 person by visibility 127 categoryशैक्षणिक
रघुनाथ गांगुर्डे हे गगनबावडा तालुक्यातील साळवण येथे वास्तव्यास असून त्यांनी एम ए बी एड एम ए एज्युकेशन यामध्ये पदवी घेतलिय. गेली दहा वर्षे ते या पदावर अविरत पणे कार्य करत आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. गगनबावडा सारख्या डोंगराळ दुर्गम अति पावसाच्या भागात कोविड काळात कोविड योद्धा म्हणून उत्तम कामगिरी बजावली, त्याचबरोबर कोविडच्या लॉकडाऊन काळात गोरगरीब जनतेला, मजुरांना, क्वारंटाईन व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी प्रापंचिक साहित्य पोहोच करून एक सामाजिक बांधिलकी जपली, सोबतच बाल संरक्षकांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला. आपत्कालीन परिस्थिती उद्भवले असता समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक औद्योगिक वैद्यकीय सांस्कृतिक क्रीडा सेवाभावी संस्था अशा विविध क्षेत्रातील माध्यमांतून जनजागृतीसह प्रत्यक्ष मदत करण्याचे कार्यही त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले असून अजूनही करत आहेत. गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांच्याकडून प्रेरणा घेत किरण मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ गांगुर्डे हे सामाजिक कार्य करत आहेत. गांगुर्डे यांचे कार्य शिक्षण क्षेत्रातील नव्या आव्हानांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.