देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री?
schedule23 Nov 24 person by visibility 184 categoryराजकीय

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असून, भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वाधिक स्ट्राईक रेट आणि जागा मिळवून आघाडीवर आहे. या विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा जोरात सुरु झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्रीपदाची निवड सामूहिक निर्णयाने होईल आणि या निर्णय प्रक्रियेत भाजपचे केंद्रीय नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आमचे नेते अमित शाह यांनी यापूर्वीच सांगितले आहे की मुख्यमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांचे (भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट) नेते एकत्र येऊन चर्चा करतील. या बैठकीत भाजपचे केंद्रीय नेतृत्व, विशेषतः अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची उपस्थिती असेल. सर्व नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाची घोषणा होईल.” दरम्यामन राज्यातील महिलांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही चक्रव्यूह फोडून बाहेर पडलो.” : लाडक्या बहिणींचं खंबीर पाठबळ आमच्यासोबत आहे असेही ते म्हणाले.