डॉक्टर सुजित मिंणचेकर फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
schedule23 Sep 24 person by visibility 96 categoryशैक्षणिक
कुंथुगिरीथे डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशन आयोजित आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मा. मंत्री, आम. भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न.
गेली अकरा वर्ष सातत्याने हातकणंगले विधानसभा मतदार संघामध्ये आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना "आदर्श शिक्षक" पुरस्काराने तसेच शाळांना "आदर्श शाळा" पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मा. मंत्री तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आदरणीय भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते तसेच उपनेते व कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. सुजित मिणचेकर व महाराष्ट्र राज्य संघटक चंगेजखान पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या पुरस्कर वितरण सोहळ्या दरम्यान हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विविध शिक्षकांना व विविध शाळांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते सागर बगाडे यांना देखील यावेळी मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदरच्या पुरस्कर वितरण सोहळ्यास मा. आम. उल्हासदादा पाटील, मा. जिल्हापरिषद सभापती प्रवीणजी यादव, ज्येष्ठ मार्गदर्शक मा. जिल्हापरिषद सदस्य महेशभाऊ चव्हाण, कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख हाजी असलमजी सय्यद, डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिणचेकरसो, कार्यवाह सौ. लेखा मिणचेकर (वहिनी), तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, संचालक, पुरस्कारप्राप्त शिक्षक, शिक्षिका विविध शाळांचे प्रतिनिधी, नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)