आमदार जयश्री जाधव यांचे हस्ते महाराष्टाची रणरागिणी अवॉर्डचे वितरण
schedule09 Mar 24 person by visibility 90 categoryरणरागिणी पुरस्कार
कोल्हापूर : आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, सजलेलं सभागृह अशा आनंदी वातावरणात स्पीड न्यूज वूमन्स क्लब, यशराज प्रोडकशन आणि शोध लोककलेचा वारसा कलावंताचा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेला महाराष्टÑाची रणरागिणी अॅवॉर्ड २०२४ गौरव महासोहळा उत्साहात पार पडला. आमदार जयश्री जाधव, निवृत्त शिक्षिका शैलजा निंबाळकर-धामणकर, राष्ट्रीय प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. अजित देसाई, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजिका शामल पाटील-मोकाशी, विजयमाला फौंडेशनच्या अध्यक्षा प्रियांका संकपाळ-साळोखे, लोटस वूमन्स असोसिएशनच्या संजिवनी भरडे आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महिला दिनादिवशी झालेल्या यथोचित सन्मानाने पुरस्कारप्राप्त महिला भारावून गेल्या. तर त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारात जल्लोषाचे वातावरण पसरलं होतं.
महाराष्टात अल्फावधीत लोकप्रिय ठरलेलं स्पीड न्यूज वूमन्स क्लब, यशराज प्रोडक्शन समुह आणि शोध लोककलेचा वारसा कलावंताचा यांच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वत:च्या कार्याचा ठसा उमटविणाºया, समाजाच्या विकासासाठी झटणाºया, स्वत:चा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्वान महिलांचा महाराष्टाची रणरागिणी अॅवॉर्ड महासोहळा घेत असतो. यंदाही ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील आंबेवाडी येथील दत्त समर्थ सांस्कृतीक सभागृहात या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं. सुरुवातीस शोध लोककलेचा वारसा कलावंताचा यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सुरुवात झाली. एकापेक्षा एक सरस लावण्यांच्या स्पर्धा लहान व मोठ्या गटात झाल्या. या लावण्यांना प्रेक्षक वर्गातून मोठ्या प्रमाणात दाद देण्यात आली.