Maha Hit 24
Register

जाहिरात

 

जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे: अमोल येडगे

schedule20 Sep 24 person by visibility 58 categoryआरोग्य


कोल्हापूर : प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार कीटची मदत देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेण्यासाठी जास्तीत जास्त संस्था, उद्योग संस्था-समुह, दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. 
          
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात टी.बी. फोरम व को- मॉर्बिडिटीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

 जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, टी.बी. च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर रुग्णांना उपचार मिळूनही उपचाराचा सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. सकस पोषण आहार मिळाल्यामुळे रुग्णांच्या औषधोपचारात खंड पडत नाही. नियमित विनाखंड औषोधोपचार घेतल्यामुळे रुग्णास पुढील टप्प्यातील टी.बी. होत नाही व तो रुग्ण वेळेत पुर्ण बरा होतो. त्यामुळे उद्योग संस्था, उद्योग समुह, दानशूर व्यक्ती यांनी निक्षय मित्र बनुन या अभियानात सहभाग नोंदवावा. 
               
सर्व क्षयरुग्णांना मोफत निदान, औषधोपचार यासह टीबी कार्यक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जावा. शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार क्षयरोग संशयितांचे टेस्टिंग वाढवावे. टीबी-एचआयव्ही ,टीबी-डायबिटीक समव्याधीग्रस्त रुग्णांचे तपासणीचे प्रमाण वाढवावे. जिल्ह्यातील १०० टक्के संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार मिळण्यासाठी नियोजन करुन जास्तीत जास्त संस्था, दानशूर व्यक्ती यांना निक्षय मित्र बनण्यासाठी संपर्क करावा. क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये निकष पूर्ण करुन जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवावा व क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये जास्तीत जास्त गावे क्षयमुक्त होतील याचे नियोजन करावे, असे सांगून या कार्यक्रमांतर्गत कामकाजाबाबत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. 

      
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी संगणकीय सादरीकरणातून जिल्ह्यातील टीबी कार्यक्रमाबाबत व टी.बी. को-मॉर्बीडिटी विषयी माहिती दिली. बैठकीस जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ.सुनंदा गायकवाड, जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.चेतन हांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, कोल्हापूर महानगरपालिका आरोग्यधिकारी. डॉ.प्रकाश पावरा, सीपीआरच्या टीबी विभाग प्रमुख डॉ.अनिता सैबन्नावार, करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी (डी.टी.सी.)डॉ.पी.ए.पटेल,शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अमरसिंह पोवार, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉ.प्रवीण नाईक, किर्लोस्कर ऑइलचे शरद आजगेकर, सेवाभारती इचलकरंजी अध्यक्ष डॉ. राजेश पवार, डयापको समन्वयक दीपा शिपूरकर, डॉ.अभया यादव, बरे झालेले क्षयरुग्ण (टीबी चॅम्पियन) यांच्यासह या विषया संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व बैठकीचे सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes