Maha Hit 24
Register

जाहिरात

 

शिक्षक व विद्यार्थी नातेसंबंध दृढ करणारा लघुपट दोरवा ; अशोक नारकर

schedule20 Sep 24 person by visibility 36 categoryखेळ


अक्षय खांबे / कळे: शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील गुरु-शिष्याचे नातेसंबंध दृढ करणारा लघुपट " दोरवा " असून या लघुपटातून समाजाला प्रेरणादायी असा सामाजिक संदेश निर्माता व दिग्दर्शक अमरसिंह संघर्ष यांनी दिला असल्याचे प्रतिपादन चित्रपट निर्माते व उद्योजक अशोक नारकर यांनी केले. ते मल्हारपेठ ( ता. पन्हाळा ) येथील हनुमान मंदिर येथे " दोरवा " या लघुपटाच्या प्रदर्शन सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी मल्हारपेठच्या सरपंच शारदा दत्तात्रय पाटील होत्या. 
      
या लघुपटाच्या माध्यमातून अमरसिंह संघर्षी यांनी ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव दिला असून चित्रपट क्षेत्रामध्ये अमरसिंह संघर्षी आपला एक वेगळा ठसा उमठवतील असा विश्वासही अशोक नारकर यांनी यावेळी व्यक्त केला. 
     
कार्यक्रमास सावर्डेचे सरपंच संभाजी कापडे, मोरेवाडी चे सरपंच डॉ.रणजित तांदळे, मल्हारपेठचे उपसरपंच राजेंद्र महाजन, मोरेवाडीचे उपसरपंच नितीश मोरे, सिद्धकला हायस्कूल मल्हारपेठ -सावर्डेचे मुख्याध्यापक एस. व्ही.पाटील, गीतकार व जिल्हा दूध संघ गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद काळे , सहाय्यक दिग्दर्शक दिलीप घारे पाटील, सिनेमा ऑटोग्राफर प्रतीक नारकर, पी.बी. टिक्के, को.जि.मा.शि. पतपेढीचे संचालक के. एच. पाटील, सुधाकर नारकर, नामदेव भोसले, संतोष नारकर, संदीप नारकर यांच्यासह धामणी खोऱ्यातील चित्रपट रसिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     निर्माता-दिग्दर्शक अमरसिंह संघर्षी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सुभाष नारकर यांनी आभार मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes