शिरोळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु
schedule03 Jun 24 person by visibility 191 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: शिरोळ येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अंतर्गत मौजे आगर ता. शिरोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात इयत्ता 8 वी 11 वी तसेच महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयात प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता मोफत प्रवेश देणे सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृहात विनामूल्य प्रवेशासाठी कार्यालयीन वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षकांनी केले आहे.
वसतिगृहात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास व आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, नाष्टा, दोन वेळचे भोजन, सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष व 24 तास वाय-फाय, मनोरंजन कक्ष व अत्याधुनिक जीम, सभागृह, क्रीडांगण व इतर शैक्षणिक सोयीसुविधा मोफत आहेत.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8856007439 व 7620238173 वर संपर्क साधावा.