Maha Hit 24
Register

जाहिरात

 

शनिवारी रोजगार मेळावा

schedule15 Jul 24 person by visibility 135 categoryनोकरी

कोल्हापूर  : 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य, मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

 या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 25 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 1300 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, ‍अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 5 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्वयंरोजगाराकरीता विविध मंहामंडळाकडील शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes