अखेर दूधगंगा नदीतील शोधकार्य थांबले; दोन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले
schedule02 Jul 24 person by visibility 100 category

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाच्याजवळ असलेल्या दूधगंगा नदीत दोघे बुडाल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळतात राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापननं बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे चव्हाण आणि जवान हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होत. या शोधकार्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान गणेश चंद्रकांत कदम (वय 18), प्रतीक पाटील (वय 22) अशी बुडालेल्या तरुणांची नावे असून या दोघांपैकी आज २ जुलै रोजी प्रतीक पाटील याचा मृतदेह सकाळी अकरा वाजता तर काही कालांतराने दुपारी १२ च्या सुमारास गणेश कदम याचा मृतदेह सापडला. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.