Maha Hit 24
Register

जाहिरात

 

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर

schedule22 Oct 24 person by visibility 135 categoryगुन्हे


कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिक सतर्क झाले असून कोल्हापुरातील उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाकडून 1 एप्रिल 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीबाबत अनेक कार्यवाह्या करण्यात आल्या. 

या कालावधीत एकूण एक हजार एकशे 48 गुन्हे नोंदवले गेले आहेत, ज्यामध्ये एक हजार नव्वद आरोपींना अटक करण्यात आले. त्याचबरोबर विभागाकडून 48 वाहने जप्त करण्यात आली असून यामध्ये एकूण पंचवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्तर रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 93 अंतर्गत चांगल्या वर्तणूकाचे बंधपत्र घेण्यासाठी 94 प्रस्ताव संबंधित उपविभागीय दंडधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यापैकी 69 आरोपींना बंधपत्र मिळाले आहे, मात्र बंधपत्र घेतलेल्या 8 आरोपींविरुद्ध पुन्हा गुन्हे नोंदवले गेले आहेत.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती आणि विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी नऊ विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून 2 कायम स्वरूपी आणि 2 तात्पुरते सीमा तपासणी नाके कार्यान्वित केले आहेत.

अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व देशी आणि विदेशी मद्यनिर्माणी घटक तसेच सीमा तपासणी नाक्यांचे CCTV थेट प्रक्षिप्त करण्याचे निश्चित करण्यात आल्यामुळे अवैध व्यापारास प्रतिबंध करण्यात मदत होईल. 

नागरीकांना अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुक याबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर व 18008333333 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून यामुळे निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल, असे आवाहन अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर नरवणे यांच्याकडून करण्यात आले. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes