सोने - चांदीच्या दरात घसरण
schedule07 Aug 24 person by visibility 176 categoryउद्योग

मुंबई;सोने खरेदी करणाऱ्यांसाठी बुधवार दिनांक 7 ऑगस्ट हा दिवस उत्तम आहे. कारण आजचा दिवशी सोन्या चांदीच्या दारात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सोने चांदीचे दर घसरले असून सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही उत्तम संधी आहे.
सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 69,270 रुपये इतकी आहे. तर, चांदी 165 रुपयांच्या तेजीने 79,788 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे. काल चांदीचा व्यवहार 79,623 रुपयांवर स्थिरावला होता.
ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकेची मागणी आणि कमी व्याजदर ही सोन्याच्या स्वस्ताईसाठी चांगले संकेत ठरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 440 रुपयांनी घसरले आहेत. तर, 22कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 63,500 रुपये इतके आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.