तोतया पत्रकाराचा कारनामा; कोल्हापुरात खळबळ
schedule10 Oct 24 person by visibility 313 categoryगुन्हे

अधिक माहिती अशी की, पत्रकार मुल्ला याच्यासह अनोळखी सात ते आठ जणांनी लक्ष्मीपुरी पानलाइन येथील प्लास्टिक दुकानात जात मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे भासवत दुकान सील करायची धमकी दिली. तसेच दुकानदार दर्डा यांच्याकडे खंडणीची मागणी करत खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. दरम्यान दर्डा यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार पोलिसांनी संशयित मुल्ला, पवार यांच्यासह संशयित आरोपी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अजित पांडुरंग पवार या आरोपीस अटक करण्यात आली आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.