Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मांस खाणारा बॅक्टेरिया

schedule24 Jun 24 person by visibility 99 categoryआरोग्य

जपान: स्ट्रेप्टो-कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम. मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे हा आजार होत असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात बा जीवाणू शरीराचे मांस खात नसून शरीरातील ऊतींचा नाश होतो. हे रुग्णासाठी अतिशय धोकादायक ठरते.यात दगावणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जपानमध्ये 2024 मध्ये 1 हजार केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. एसटीएसएस या रोगाचा मृत्यू दर 30 टक्के आहे. हा रोग स्ट्रेप्टो-कोकस या बॅक्टेरियामुळे होतो. एसटीएसएस या जीवाणूचे 2 प्रकार आहेत. 

ग्रुप-ए स्ट्रेप्टो-कोकस आणि ग्रुप-बी स्ट्रेप्टो-कोकस. यामधील ग्रुप-ए स्ट्रेप्टो-कोकस हा अधिक गंभीर जीवाणू मानला जातो. एसटीएसएस जिवाणू संसर्गामुळे विषारी द्रव्ये शरीरात पसरतात. यामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांना टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणतात. हा एक जीवघेणा आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

हा एक जिवाणू संसर्ग आहे जो सामान्यतः स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे होतो. कधीकधी हे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियामुळे देखील होते. हे जीवाणू विविध ठिकाणी तसेच काही वेळा आपल्या त्वचेवर असतात. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांना या विषाणूचा संसर्ग लगेच होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर पुरळ उठून जखमा होतात.

एखाद्याला दुखापत झाली किंवा त्याची जखम उघडी राहिली असेल किंवा कोणीतरी शस्त्रक्रिया झाली असेल अशा लोकांनी काळजी घ्यायला हवी. यांच्या जखमेत जिवाणू संसर्ग वाढल्यास आणि वेळीच उपचार न केल्यास तिथे विषारी शॉक सिंड्रोम होऊ शकते. जर हा जीवाणू स्ट्रेप्टोकोकस असेल तर त्याला एसटीएसएस म्हणतात. अलीकडे जपानमध्ये याचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes