Maha Hit 24
Register

जाहिरात

 

बँक ऑफ महाराष्ट्रकडून सफाई कर्मचा-यांसाठी गणबुट

schedule31 Jul 24 person by visibility 127 categoryसामाजिक

कोल्हापूर : पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 450 गणबुट आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी व बॅकेंचे कोल्हापूर झोनल मॅनेजर के.सुनिता यांच्या हस्ते सफाई कर्मचा-यांना हे गणबुट वाटप करण्यात आले. 

हा कार्यक्रम महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये घेण्यात आला. प्रशासकांनी काल फिरती करताना सफाई कर्मचा-यांना गनबुट नसलेचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सीएसआर मधून बँक ऑफ महाराष्ट्र यांना गनबुट देणबाबत आवाहन केले. या आवाहन प्रतिसाद देऊन आज बँक ऑफ महाराष्ट्र यांनी महापालिकेस गणबुट दिले.

          यावेळी बँकेचे मॅनेजर उमेश शिंदे, अमित आनंद, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रनभिसे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes