सलग तीन दिवस सोन्यात घसरण..
schedule23 Sep 24 person by visibility 73 categoryउद्योग
सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण होत असल्याचे दिसून येते. या काळात ग्राहक मौल्यवान धातूची शक्यतोवर खरेदी करत नाहीत. या आठवड्यात मौल्यवान धातूत सुरुवातीला घसरण दिसली. अखेरच्या टप्प्यात मात्र दोन्ही धातूंनी कमाल उसळी घेतली. पितृपक्षात किंमतीचा आलेख उंचावला. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात केल्याने जागतिक बाजारात किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात तुफान आले आहे. दुसरीकडे कच्चा तेलाच्या भाव निच्चांकी पातळीवर आले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी किंमती वधारल्या आहेत.
24 कॅरेट सोने 74,093, 23 कॅरेट 73,796, 22 कॅरेट सोने 67,869 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,570 रुपये, 14 कॅरेट सोने 43,344 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,917 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
या आठवड्यात सलग तीन दिवस सोन्यात घसरण दिसली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि अखेरच्या सत्रात किंमती उसळल्या. सुरुवातीला 110 रुपये तर तर 20 सप्टेंबर रोजी सोन्याने 660 रुपयांची भरारी घेतली. 21 सप्टेंबर रोजी किंमतीत बदल झाला नाही. पण पुढील आठवड्यात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहे.