सोने -चांदीचे दर वधारले
schedule29 Jun 24 person by visibility 144 categoryउद्योग

मुंबई : गेल्या पंधरवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे समोर येते आहे. 28 जून 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी महाग झाली आहे.
भारतीय सराफा बाजारात दहा ग्रॅम सोने 73,650 रुपयांवर महागले आहे. एक किलो चांदीचे दरही मजबूत झाले असून आता ते 91,200 रुपयांना विकले जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. "दिल्ली मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड (24 कॅरेट) किमती 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. मागील बंद किंमतीपेक्षा ते 370 रुपये अधिक मजबूत आहे.