Maha Hit 24
Register

जाहिरात

 

तळसंदे कृषी विज्ञान केंद्रांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष-आमदार राजू बाबा आवळे

schedule24 Sep 24 person by visibility 103 categoryलाइफस्टाइल

डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्यातर्फे कृषी विज्ञान केंद्रांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि कर्तृत्वांचा गौरव करण्यासाठी "कृषक स्वर्ण समृध्दी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाचे उद्धाटन आमदार राजू बाबा आवळे हस्ते पार पडले.

कृषी विज्ञान केंद्राने या दशकात कृषीक्षेत्रात आमुलाग्र असा बदल घडवला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाला कृषीक्षेत्रात अग्रेसर बनवले आहे. त्यांच्या या अमुल्य योगदानाबद्दल आपण सर्वजण ऋणी आहोत. तसेच कर्तृत्वान व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डाॅ अनिलकुमार गुप्ता, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, प्राध्यापक, विद्यार्थी, शेतकरी, महिला आदी उपस्थित होते.

                                                                       कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे)


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes