Good bye यश अरूंधती देशमुख.....
schedule25 Nov 24 person by visibility 41 categoryमनोरंजन
आई कुठे काय करते' या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेचा अखेरचा भाग आता शूट झाला आहे, आणि अभिनेता अभिषेक देशमुख, जो यशच्या भूमिकेत होता, त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने मालिकेच्या समाप्तीबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. अभिषेकने लिहिलं की, "यशने मला भरभरून प्रेम दिलं आणि ओळख दिली. जेव्हा मालिकेची सुरूवात झाली, तेव्हा कधी एक दिवस समाप्त होईल याचा विचारही केला नव्हता. पाच वर्षे एकाच कॅरेक्टरच्या साथीत राहिल्यानंतर आता त्याचं निरोप घेणं अवघड झालं."
PACK UP! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं, 5 वर्षांपासून सोबत असलेलं “कुणीतरी”आता कधीच नसेल किंवा असेल ह्यातली घालमेल घरी येईपर्यंत होती..निघताना भेटीगाठी झाल्या,आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं..कुणाला तरी भेटायचं राहीलंय असं वाटतच होतं..शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो,मेक अप रूम मधे, आरशात बघून आलो..पहील्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो..बॅग जराशी जड वाटत होती..निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक!! त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.. “मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार..त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे..” असं शहाण्यांना वाटत असेल..पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं..!
‘यश’ने मला भरभरून प्रेम दिलं..ओळख दिली..अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक,आपलेपणा,आशिर्वाद उर्जा देणारे होते..TV ह्या माध्यमाची ताकद काय असू शकते ह्याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते..आईच्या भोवती फिरणारं यश चं वर्तुळ अखेर पुर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल ह्याची खात्री आहे कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं..हे करण्याची मला संधी दिली त्या बद्दल मी आमच्या Project Head आणि लेखिका नमिता वर्तक @vartak.namita ह्यांचा ऋणी असेन..नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं..त्याच बरोबर आमचे Producer @rajan.shahi.543 @directorskutproduction Thank You so much🙏🏻..Big Thanks to स्टार प्रवाह.. @star_pravah सतीश राजवाडे @ankitasuniltawde आमचे दिग्दर्शक @ravikarmarkar @baresubodh @tusharvichare रोहीत पाटील आमचे DOP राजू देसाई,राजेश मोहीते, Editors, Art Director, आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले,चित्रा पाटणकर-गाडगीळ ,तुषार जोशी @tusharjosheee आणि अरूंधती पासून जानकी पर्यंत सगळे कलाकार..