सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळात अडकण्याच्या घटनेवर चांगली बातमी
schedule02 Jul 24 person by visibility 119 categoryआंतरराष्ट्रीय

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख ( ISRO ) एस.सोमनाथ यांनी सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ स्थानकातील अडकण्याच्या घटनेवर चांगली बातमी दिली आहे. सोमनाथ म्हणाले की त्यांच्या परतण्यात काही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे काहीही चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांनी म्हटले आहे.
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या आहेत. त्यांना आणणारे अंतराळ यान चौथ्यांदा बिघडले असल्याने त्यांचे पृथ्वीवर येणे पुढे ढकलले आहे. यासंदर्भात इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की मुळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अनेक अंतराळवीर संशोधनासाठी मुक्काम करीत असतात. सुनिता विल्यम्स सोबत अन्य अंतराळवीर देखील आहेत. अंतराळ स्थानक अनेक महिन्यांच्या मुक्कामाला योग्य असते असेही सोमनाथ यांनी सांगितले.